-->
करमाळासामाजिक

गोविंद देशमुख यांची मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर एक येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशमुख यांची मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित दादा चव्हाण यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पदाधिकारी निवडी चा कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष अमित दादा चव्हाण म्हणाले की, गोविंद देशमुख यांनी कोरोना काळात पेशंट ला बेड उपलब्ध करून देणे, प्लाज्मा उपलब्ध करुन देणे,अशी चांगली कामे केली. त्यामुळे त्यांच्या हातून अशीच सामाजिक कार्य चालू राहण्यासाठी त्यांना मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य च्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठान हे सामाजिक कार्यामध्ये,शिवकार्यामध्ये,गडकिल्ले संवर्धन मध्ये आपले योगदान गेल्या दहा वर्षापासून देत आहे.
सर्व निवड झालेल्या पदाधिकारी यांनी जनतेचे प्रश्न सोडवणेसाठी प्रयत्न करावेत. सर्वांना मनापासून शुभेच्छा

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close