कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


वाडा पुनर्वसन, ता. शिरूर येथील सरपंच नवनाथ रंगनाथ माळी यांची नुकतीच सरपंच सेवा महासंघाच्या शिरूर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे व राज्य संपर्क प्रमुख राहुल उके यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र नवनाथ रंगनाथ माळी यांना देण्यात आले. नियुक्तीनंतर माळी यांचा वाडा पुनर्वसन ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी समता परिषदचे जिल्हा सरचिटणीस संतोष माळी, विशाल नायकुडे, माजी उपसरपंच राजेश हत्ते, संपत माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत माळी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
आगामी काळात सरपंच व ग्रामस्थ यांच्या न्याय हक्कांसाठी आपण काम करणार असल्याचे नवनाथ माळी यांनी यावेळी सांगितले.



