केम प्रतिनिधी (संजय जाधव)


करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या प्रयत्नातून मल्टीपल टेस्टिंग मशीन उपलब्ध झाली असून या मशीनचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
याप्रसंगी केम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष पालखे साहेब यांनी मशीनचे प्रॅक्टीकल दाखवून उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ यांना मशीन बद्दल माहिती सांगितली. तसेच यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जनतेने या मशीनचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रमावेळी आरोग्य अधिकारी कावळे साहेब, समुदाय अधिकारी निलेश कुबेर, मेंगाळ सिस्टर, बर्गे सिस्टर, शितल घायाळ सिस्टर, घोडके सिस्टर, महेश तळेकर, पुजा तळेकर, गावडे सिस्टर, तळेकर सिस्टर, पाटील साहेब, साळुंखे साहेब,भोसले साहेब, बांगडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य राहुल कोरे, अनंता तळेकर, मा. पं. स. सदस्य विष्णू दादा पारखे, भैरु शिंदे, खंडू शेठ वासकर, संजय जाधव, गणेश शेटे, लोंढे सर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




