-->
करमाळाविशेष

फळपिक विमा योजना सुरू; फळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न सुरक्षित करावे- ता.कृ.अधिकारी देवराव चव्हाण

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा कृषी विभागामार्फत हवामान आधारित फळपिक विमा योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत सहभागी होऊन फळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न सुरक्षित करावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

फळपीक विमा जनजागृती प्रसार यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रचार व प्रसार करणाऱ्या रथाचा शुभारंभ व पूजन प्रगतशील शेतकरी नासिर समसुद्दिन कबीर तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.

 

शासनाच्या कृषी शी निगडीत अनेक चांगल्या योजना आहेत. पण या योजनेचा फायदा घेण्यात शेतकरी कमी पडतो किंबहुना त्याच्यापर्यंत या योजनेची माहिती जात नाही. त्यासाठी गावागावातील कृषी सहाय्यक यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना शासकीय योजना समजून सांगावी.

  – नासिर कबीर

  – प्रगतशील शेतकरी

 

यावेळी बोलताना तालुका कृषी अधिकारी देवराव चव्हाण म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची विमा उतरविण्याची जबाबदारी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे देण्यात आली आहे. सीताफळ, डाळिंब, केळी आदी फळांच्या बागेचे पिक विमा उतरण्याचे काम सुरू आहे. या पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्दैवाने पिकाचे नुकसान झाले तर संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात येणार असून या योजनेची माहिती प्रत्येक गावागावात देण्यात येत आहे. ज्यांना फळबागेचा विमा उतरवायचा आहे त्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांना भेटावे किंवा थेट तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

 

यावेळी कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी ए.एस. चव्हाण, एस.जे. पोळके, के.पी. मस्तूद, एस.जी. गायकवाड, खलसे, बी एम गायकवाड आदी कृषी अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close