-->
करमाळाक्रीडादेशविशेषसामाजिक

सैन्य दलात बढती मिळाल्याने राजेंद्र घोडके यांचा धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या वतिने सत्कार

करमाळा प्रतिनिधी

गौंडरे येथील सुभाष गोवर्धन कोपनर यांचे जावई राजेंद्र घोडके यांना भारतीय सैन्य दलात बढती मिळाली आहे.
13 वर्ष त्यानी सेवा बजावली असून सध्या अमृतसर पंजाब येथे त्यांची पोस्टींग झाली आहे ,त्यांना बढती मिळाल्याबद्दल धर्मवीर संभाजी विद्यालयाच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन घोडके यांचा सत्कार करण्यात आला.

निस्सीम देशभक्ती मनात असलेले हे कुटुंब असुन राजेंद्र घोडके यांचे धाकटे बंधु देखील सैन्यात भरती झाले आहेत सध्या ते लडाख येथे देशसेवा बजावत आहेत .खडतर परिस्थितीत दोन्ही बंधुनी यश संपादन केल्याने धर्मवीर संभाजी विद्यालाच्या वतीने आज सत्कार आयोजित करण्यात आला होता

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र घोडके म्हणाले कि विद्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कारामुळे भारवलो असुन युवकांनी सैन्यात भरती होण्याचे देखील त्यानी आवाहन केले .

या वेळी मुख्याध्यापक बापु निळ, युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे सहशिक्षक उत्तम हनपुडे,हरिदास काळे,यशवंत कोळेकर,वैजीनाथ भोईटे,इंद्रजित मुळिक,सुखदेव गिलबिले,संतोष पुराणे,अशोक जावळे, सुभाष कोपनर
कर्माचारी व्हि .डी निळ ,बापु तांबोळी,श्रीकांत नलबे,प्रकाश साळवे,श्रिमती सुवर्णा नलबे व विद्यार्थी उपस्थित होते

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close