-->
राजकियराज्य

BREAKING: देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३८ आमदारांनी केलेली बंडखोरी आणि सत्यानाट्या च्या राजकारणानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलटफेर घडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करत मी मंत्रिमंडळात सहभागी होणार नसून शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.

 

मागील १० दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. त्यातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकारण हादरून सोडल आहे. भाजप आणि शिवसेना सरकार मध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असणार आहेत तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः कॅबिनेटमध्येही नसणार ही गोष्ट फडणवीस यांनी स्वतः प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे.

 

 

आज संध्याकाळी ०७:३० वाजता एकनाथ शिंदे यांचा शपथविधी राजभवनात पार पडणार आहे. एकनाथ शिंदे हे एकटेच आज शपथ घेणार असून ही हिंदुत्वाची लढाई असल्याने आम्ही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं असंही फडणवीस म्हणाले आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close