माय मराठी न्युज प्रतिनिधी


०१ जुलै रोजी महाराष्ट्र विकास विद्यार्थी आघाडी च्या वतीने कु.आकांक्षा शेळके यांनी राज्यातील कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या फी माफी साठी पत्र पाठवून पाठपुरावा केला होता अशा विविध मागण्यांचा विचार करत सरकारने आज

१) ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोविड-19 च्या आजाराने मयत झाले आहेत अश्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होई पर्यंत पुर्णतः फी माफ करण्यात आली.
२) अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ यांच्याकडून आकारण्यात येणारा जिमखाना, विविध गुणदर्शन शुल्क कॉलेज मॅक्झिन शुल्क संगणक शुल्क क्रीडा निधी वैद्यकीय मदत निधी त्याच बरोबर युथ फेस्टिवल अशा विविध बाबी वरील कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या वर्षासाठी त्या बाबींचा हा आकरण्यात येणारा शुल्क पूर्णतः माफ करण्याचा निर्णय घेतला.
३) प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयांमध्ये e-content विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली.
४) विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने वस्तीग्रह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णता माफ करण्यात आले.
५) विना अनुदानित व कायम विनाअनुदानित असलेल्या महाविद्यालयात देखील इतर शुल्क मधील जिमखाना शुल्क विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क कॉलेज मॅक्झिन शुल्क संगणक शुल्क क्रीडा निधी वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल अशा विविध बाबींवर होणारा खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली.
६) त्याचबरोबर २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील वर्षात समायोजित करण्यात येणार आहे.
७) त्याच बरोबर विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क तीन ते चार हप्त्यांत भरण्याची सवलत देण्यात यावे तसेच शुल्क थकित असेल तर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवणार नाही असा निर्णय उच्च शिक्षण विभागाने देण्यात आला.
असे प्रकारचे निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांकडून आकांक्षा शेळके यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.




