-->
करमाळाराजकिय

करमाळा भाजपाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी लक्ष्मण केकान, अयोध्या येथील सैनिक स्मारक ट्रस्ट च्या सहसचिव पदी नरेंद्रजी ठाकूर, तसेच पत्रकार दिनेश मडके यांची नरेंद्र महाराज संप्रदाय करमाळा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल करमाळा शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पक्षाचे विचार, ध्येय व धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवून ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच सर्वसमान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम करणार आहोत.

या सत्कार समारंभाप्रसंगी करमाळा तालुका सरचिटणीस नगरसेवक महादेव फंड, अमरजीत साळुंखे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, मकाई कारखान्याचे मा संचालक अमोल पवार, रेल्वे सल्लागार सदस्य दिपक चव्हाण, व्यापार आघाडी अध्यक्ष जितेश कटारिया, युवा मोर्चाचे मयूर देवी, राष्ट्रीय समाज पार्टी तालुकाध्यक्ष अंगद देवकते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close