-->
आरोग्यराज्यविशेषसामाजिक

किरणताई पल्लोड फाउंडेशन व बजरंग दलाच्या वतीने पिंपरी माळेगाव येथे महाआरोग्य शिबिर संपन्न

 

प्रतिनिधी/बाळासाहेब खांडभोर

 

हनुमान जन्मोत्सवा निमित्त किरणताई पल्लोड फाऊंडेशन व बजरंग दल मावळ तालुका यांच्यावतीने आयोजित भव्य महा आरोग्य शिबिर रविवार दि.१७ एप्रिल रोजी पिंपरी माळेगाव येथे उत्साहात संपन्न झाले.

मावळ तालुक्यातील आंदरमावळ हा ग्रामीण भाग असून त्यातील सावळा खांडी हा शेवटचा भाग आहे. या परिसरात कसल्याही दवाखान्याची सुविधा नाही. त्यात एस.टी बस बंद आहे. प्रवासचे दुसरे साधनही नाही. साधं क्लिनिक म्हटल तरी ३० कि.मी वर टाकवे या ठिकाणी जावे लागते. मोठे हॉस्पिटल ला जायचं म्हटलं तर तळेगाव, वडगाव शिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या पाहायला मिळतात. रोजगाराच्या समस्यामुळे आर्थिक परिस्थीती ही नाजूक आहे. तरुण मंडळी कामानिमित्त कान्हे, वडगाव, तळेगाव येथे जात असल्यामुळे स्वतःचा उपचार त्यांना करता येतो. परंतु, लहान मुल, महिला, वयोवृध्द मंडळी बरेच आजार अंगावर काढतात. त्यामुळे पुढे त्या आजाराचे लक्षण वाढू लागते व गंभीर आजारात रूपांतर होते. आर्थिक अडचणीमुळे दवाखाना परवडत नसल्याने वेळ प्रसंगी जीव ही गमवावा लागतो. अशा परिस्थीतीत या भागात आरोग्य शिबिराची गरज ओळखून किरणताई पल्लोड फाऊंडेशन व विश्व हिंदु परिषद, बजरंग दल सारख्या संस्था, संघटना पुढे येऊन लोक उपयोगी उपक्रम घेतात.

आरोग्य शिबिरात महिलांची तपासणी, लहान मुलांची तपासणी, डोळ्यांची तपासणी, जनरल तपासणी, हाडांची तपासणी अशा अनेक तपासण्या करून औषध उपचार करण्यात आले. या शिबिरात ७२० नागरिकांनी सहभाग घेतला होता अशी माहिती संदेश भेगडे यांनी दिली. या शिबिरात तरुणांचा सहभाग व्हावा, म्हणून रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ६५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला व रक्तदान केले.

 

तपासणी अंती या भागातील नागरिकांमध्ये जीवन सत्वांचा अभाव, स्रीयांचे आजार, आरोग्य विषयी अज्ञान, त्वचा रोज, सांधे दुःखी अशा अनेक आजाराच्या समस्या या दुर्गम भागात आढळुन आल्या असे डॉ. रविकिरण अनुसे यानी सांगितलं.

 

सततच्या वातावरणातील बदलामुळे सध्या आरोग्याच्या अनेक समस्या सतावत आहेत. अशा सामाजिक सेवेसाठी बजरंग दल सदैव तत्पर असून प्रत्येक वाडी-वस्तीवरील नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यासाठी जातीभेद मिटून एक दिलाने समाज्याची सेवा करून पुढील काळातही आसपासच्या प्रत्येक गावात आरोग्य शिबीर घेणार आहे.

प्रा. बाळासाहेब खांडभोर

 

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. रविकिरण अनुसे, डॉ. विश्वजित घोटेकर, डॉ. अमोल वाळके, डॉ. अमित पाटील, डॉ. नेहा ओव्हाळ, डॉ. रोहित कणसे, सचिन वाघमारे, सरपंच रोहिणी राजेश कोकाटे, संतोष कुंभार, शंकराव सुपे, माउली ठाकर, धनाजी शिंदे, संजय गायचरे, माजी सरपंच राजेश कोकाटे, अनिल घोडे, सुशील वाडेकर, अंकुश पिंपरकर, अनिल पिंपरकर, गोपीचंद कचरे, सुधीर राईलकर, अंकुश ठाकर, महेन्द्र असवले, हेमंत धोंडगे, निखिल भांगरे, सचिन खांडभोर, महेश भोईरकर, विकी शेटे, भरत शिंदे, संकल्प भेगडे, योगेश खांडभोर तसेच किरणताई पल्लोड फाउंडेशन ची संपूर्ण टीम आदीनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close