-->
करमाळाराजकिय

झरे येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन; अनेक कार्यकर्त्यांचा प्रहारमध्ये प्रवेश

 

केम प्रतिनीधी/संजय जाधव

 

 

 

करमाळा तालुक्यातील झरे गावात लोकनायक आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य असे करण्यात आले. यावेळी झरे व परिसरातील शेकडो तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थित आणि तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी या ठिकाणी प्रहार मध्ये प्रवेश केला.

 

 

 

यावेळी लोकनायक बच्चुभाऊ कडू यांचा सेवा, त्याग, समर्पण व संघर्ष हा विचार करमाळा तालुक्यातील घराघरापर्यंत पोचवण्यासाठी युवकांनी शपथ घेतली. या कार्यक्रमात शेकडोंच्या वरती शेतकरी, युवक स्वयंस्फूर्तपणे मोठ्या जल्लोषात सहभागी झाले होते.

 

 

 

या शाखा उद्घाटन प्रसंगी सोलापूर शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार, शहर संपर्कप्रमुख जमीर भाई शेख, जिल्ह्याचे उपाध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा औद्योगिक चे अध्यक्ष केशव जांभळे, युवा उपाध्यक्ष युनूस पठाण, करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर पवार, तालुका उपाध्यक्ष पप्पू ढवळे, युवकचे अध्यक्ष विकी मोरे, माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे, मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे, उत्तर सोलापूरचे तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, शेतकरी तालुका अध्यक्ष विशाल सपकाळ, युवक तालुकाध्यक्ष नानासाहेब खांडेकर, दक्षिण उपाध्यक्ष समर्थ गुंड, नितीन भोरे, करमाळा तालुका सचिव प्रवीण मखरे, कृष्णा शिंदे, पांगरे गावचे युवा नेते संतोष पाटील, केम शहराध्यक्ष शामकुमार बोंगाळे, नामदेव पालवे, जनार्दन मंगवडे, प्रवीण मत्रे, झरे शाखाध्यक्ष रामराजे गुळवे, लक्ष्मण गुटाळ, नारायण मोरे, अशोक जाधव, बाबा शेलार, सचिव ज्ञानेश्वर जाधव, उपसचिव गणेश चौधरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close