करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील करंजे येथील करंजे-भालेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन महिला सदस्या सौ. अनुराधा गणेश सरडे यांचे चिरंजीव कु. कृष्णा सरडे याचा वाढदिवस दि.१६/०७/२०२१ रोजी जि. प. प्रा. शाळा करंजे येथे एका अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या या महामारीच्या संकटात अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले. अनेकाच्या नोकऱ्या व रोजगार गेले. त्यामुळे अनेकांच्या रोजीरोटीचा जटील व लवकर न सुटणारा प्रश्न आ वासून उभा राहीला. अशावेळी किमान शिक्षणात तरी खंड पडू नये ही उत्कट भावना मनात निर्माण होवून ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुराधा गणेश सरडे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला होणाऱ्या खर्चामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देवून एक सामाजिक बांधिलकी जोपासली. वाढदिवसाचे औचित्य साधून लहान मुलांना केक व चॉकलेट वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सदस्यांचे प्रतिनीधी म्हणून श्री. सुभाष सरडे, श्री. पप्पू सरडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. काकासाहेब सरडे, श्री. गणेश सरडे, श्री.प्रदिप साबळे, आण्णा पाटील, विनोद सरडे, सौदागर सरडे, कैलास सरडे, मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.



