माय मराठी न्युज प्रतिनिधी


माढा करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा या साखर कारखान्याला गेल्या सहा महिन्यापूर्वी ऊस गळीत सिझन चालू असताना ऊस गाळपासाठी दिला होता. त्यात सुरली गावचे हनुमंत रोपळे नावाचे एक अपंग बांधव शेतकरी ही होते. परंतु अद्याप ही त्या शेतकर्यांना आपण गाळपास दिलेल्या उसाचे बील मिळत नव्हते. कारखान्यावर हेलपाटे घालण्याच्या पलीकडे त्यांच्या हाती काहीही लागत नव्हते. परंतु प्रहारचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वात युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार यांना घेऊन नीरा-भीमा कारखान्यावर गेल्या पंधरा दिवसापूर्वी आंदोलनाचे पत्र देण्यात आले होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या आंदोलनाच्या निवेदनाची दखल घेत भीमा कारखान्याच्या प्रशासनाने आज सुरली गावच्या एका अपंग व्यक्तीच्या जो व्यक्ती दोन्ही पायाने अपंग असून त्याला कारखान्यापर्यंत जाता येत नव्हते त्याचे चार लाखाचे आणि इतर शेतकऱ्यांची मिळून वीस ते एकवीस लाखांचे ऊसबिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आज जमा केले.
अपंग बांधव शेतकरी हनुमंत रोपळे, जे दोन्ही पायाने अपंग असून कारखान्यापर्यंत पोहोचू ही शकत नव्हते. त्यांचा चेक तर प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केला आणि उर्वरित शेतकऱ्यांचे चेक टेंभुर्णी येथे शेतकऱ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. यावेळी अपंग असणारे शेतकरी बांधव रोपळे यांनी बच्चूभाऊ कडू यांना फोनवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि बच्चुभाऊ यांनीही त्याला फोन वरून प्रतिसाद देत त्याचे म्हणणे ऐकून घेतले.
यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, शिवसेनेचे नेते बापू पाटील, युनूस पठाण व अनेक शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.




