
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष (भाजप) ने ऐतिहासिक कामगिरी करत बहुमताचा टप्पा पार केला आहे. या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडला असून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचा या निवडणुकीत पूर्णपणे पराभव झाला आहे.
या विजयाच्या पार्श्वभूमीवर करमाळा शहरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. शहरातील भाजप संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. ढोल-ताशांच्या गजरात “जय श्रीराम”, “वंदे मातरम”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले की, “पश्चिम बंगालच्या जनतेने अन्यायकारक व हुकूमशाही कारभाराला ठाम नकार दिला आहे. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत जनतेने भाजपला कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास हा देशात होत असलेल्या बदलाचा स्पष्ट संकेत आहे. हा विजय फक्त बंगालपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशात परिवर्तनाची नांदी आहे.”
या वेळी डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर तात्या जाधव, भाजपा नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, सरचिटणीस नितीन झिंजाडे, गणेश महाडिक, अमोल पवार, दत्तात्रय बेडकुते, स्वानंद वांगडे, कपिल मंडलिक, राहुल रामदासी, जयंत काळे, भरत गुंड, प्रसाद गेंड, शरद कोकीळ, संजय किरवे, गणेश गोसावी, विनोद इंदलकर, शैलेश राजमाने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




