
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा शहरात भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती आणि संत गजानन महाराज मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५ मे ते २१ मे या कालावधीत स्नेहगंगामाई आळंदीकर यांच्या शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांनी दिली आहे.
करमाळा शहरात यापूर्वीही अनेक धार्मिक कथांचे मोठ्या उत्साहात आयोजन झाले आहे. त्यामध्ये ओतूरकर महाराजांची भागवत कथा, पंडित प्रदीपकुमार मिश्रा यांची शिव महापुराण कथा, रामराव ढोक महाराजांची रामकथा तसेच भगवानजी शर्मा आणि अनुराधा दीदी यांच्या कथांचा समावेश आहे. त्याच धार्मिक परंपरेला पुढे नेत अधिकमासाच्या निमित्ताने तालुक्यातील भाविकांना शिव महापुराण कथेचा लाभ मिळावा, या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
या आयोजनासंदर्भात संत गजानन महाराज मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली. बैठकीत कार्यक्रम भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीस श्रेणिकशेठ खाटेर, विठ्ठलराव भणगे, कुरुलकर मॅडम, नगरसेवक दीपक चव्हाण, रवींद्र विद्वत, चरणसिंग परदेशी, नारायण पवार, विजय देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



