-->
करमाळाराजकिय

दे धक्का फुसका! आ. नारायण पाटील गटाचे दावे खोटे ठरवत तुषार शिंदेंचा पर्दाफाश

 

 प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमी वरती अनेक उलथापालथी होताना दिसत आहेत. एखाद्या गटाकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार दुसऱ्या गटाकडून उमेदवारी घेत आहेत. नाराज कार्यकर्ते दुसऱ्यांचा प्रचार करत आहेत अशा घटना घडत असतानाच सध्या आमदार नारायण पाटील यांच्या गटाकडून दररोज “दे धक्का” अशी मालिका सुरू आहे. परंतु हे धक्के नसून साधा स्पर्श सुद्धा झालेला नाही. हे सर्व पेल्यातील वादळ आहे असा पर्दाफाश जातेगाव चे युवानेते तुषार शिंदे यांनी केला आहे.

 

याविषयी अधिक बोलताना ते म्हणाले की, जातेगाव येथील सरपंच छगन ससाणे यांनी आमदार नारायण पाटील गटात प्रवेश केला याला अनुसरून संजयमामा शिंदे गटाला दे धक्का अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहे .हे धादांत खोटे असून ससाणे हे लोकसभा २०२४ च्या निवडणुकीपासून नारायण पाटील गटाचे काम करत आहेत. लोकसभा व विधानसभेला त्यांनी नारायण पाटील यांचे काम केले व त्यांचा प्रचार केला. यापूर्वी लोकसभेच्या वेळेस त्यांनी पाटील गटामध्ये प्रवेश केलेला आहे. असे असताना सध्या जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार पाटील गटाकडून सुरू असून दे धक्का नावाची त्यांची मालिका सध्या सुरू आहे, परंतु जनतेकडून त्यांना “जोर का झटका धीरे से” ९ तारखेला बसणार आहे. त्यामुळे सध्या त्यांचे जे उद्योग सुरू आहेत हे सर्व पेल्यातील वादळ आहे अशी सणसणीत टीका तुषार शिंदे यांनी पाटील गटावरती केलेली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close