-->
आरोग्यकरमाळासामाजिक

राजुरीतील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांवर मोफत उपचार व औषध वाटप

डॉ. अमोल दुरंदे यांचा पुढाकार

 

 प्रतिनिधी l कोर्टी (संजय साखरे)

 

डॉ. दुरंदे हॉस्पिटल (करमाळा), मेडीकोज गिल्ड आणि परिवर्तन प्रतिष्ठान (राजुरी) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १८) जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विनामूल्य महाआरोग्य शिबिरास’ राजुरीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या शिबिरात ११०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वितरण करण्यात आले.

 

ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या गावातच अत्याधुनिक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, या उद्देशाने परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमोल दादासाहेब दुरंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या. वैद्यकीय पथकाने शिबिरात आलेल्या प्रत्येक रुग्णाची आत्मीयतेने विचारपूस करून अचूक निदान केले.

 

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरासाठी राजुरी गाव आणि आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिबिरात केवळ तपासणीच नाही, तर रुग्णांना आजाराचे निदान करून जागेवरच मोफत औषधांचे वितरण देखील करण्यात आले. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

शहरातील महागडे उपचार आणि औषधे गावातच विनामूल्य मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी डॉ. अमोल दुरंदे, डॉ विद्या दुरंदे, डॉ. प्रदीप तुपेरे, डॉ. विट्ठल पवार, डॉ. रोहित साळुंखे, डॉ. नायकुडे सर व मैडम, डॉ. जिनेंद्र दोभाड़ा, डॉ. पापा मनेरी, डॉ. संकेत फाळके आणि आयोजक टीमचे विशेष आभार मानले. आरोग्य सुविधेच्या अभावी अनेकदा ग्रामीण रुग्ण उपचारांकडे दुर्लक्ष करतात, मात्र अशा शिबिरांमुळे आरोग्याप्रती जागृती निर्माण होत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close