-->
करमाळाराजकिय

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडून उद्या इच्छुकांच्या मुलाखती

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्या रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी विद्यानगर येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली.

 

याबाबत अधिक माहिती देताना चिवटे म्हणाले की, करमाळा तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने उमेदवारी इच्छिणाऱ्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखतींना भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा. चेतनसिंगजी केदार तसेच भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यानगर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असून या निवडणुकांमध्ये भाजप निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वासही यावेळी चिवटे यांनी व्यक्त केला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close