शिवगिरी ॲग्रो शुगरचा बॉयलर व मोळी पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न; ऊसाला ३००१ रुपये प्रति टन दराची घोषणा

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड विहाळ (ता. करमाळा) या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन व मोळी पूजन सोहळा शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात कारखाना स्थळी संपन्न झाला. बॉयलर आणि मोळी पूजन राजवी ॲग्रो चे चेअरमन मा.प्रा.श्री. शिवाजीराव सावंत सर व शिवगिरी ॲग्रोचे चेअरमन मा. श्री कालिदास सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल, शिवगिरी ॲग्रोचे व्हा. चेअरमन श्री. संजय सावंत, श्री धनंजय सावंत, श्री किरण सावंत, अजिंक्य सावंत हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवगिरी ॲग्रो साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री आर. पी. देशमुख यांनी केले. श्री धनंजय सावंत यांनी कारखाना सुरळीत व सुव्यवस्थेत चालविण्याकरिता येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दिग्विजय बागल यांनी कारखाना चालविताना येणाऱ्या अडचणीवर व सध्या कारखाने कसे आर्थिक अडचणी मधून जात आहे यावर आपले मनोगत व्यक्त केले व शिवगिरी ॲग्रोला मदतीचे आश्वासन दिले.
तसेच मार्गदर्शन करताना मा. प्रा. श्री शिवाजीराव सावंत सर म्हणाले की, आपण शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून गळीत हंगाम २०२५- २६ साठी ३००१/- रुपये ऊस दर घोषित केला आहे. आपण शेतकऱ्यांबरोबर ऊस वाहतूकदारांना सुद्धा चांगला वाहतूक दर देऊन त्यांचे हित जोपासत आहोत. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या या कारखान्याला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रतीचा ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन शेतकरी व ऊस वाहतूक ठेकेदारांना केले आहे. या गाळप हंगामात ५,५०,००० मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी या कार्यक्रमाला भीमराव परकाळे (आप्पा), चिंतामणी जगताप, संजय गुटाळ, सतीश बापू नीळ, युवराज रोकडे, जयंत पाटील, महादेव चौधरी, रामदास गुंडगिरे, महादेव नवले, कृष्णा पाटील , जब्बार महाजन, युवराज मामा रोकडे, शिवराज रोकडे, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूकदार सर्व खातेप्रमुख व कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केन मॅनेजर श्री राजाभाऊ खटके यांनी केले.
२८००/- रुपये चा पहिला हप्ता, १००/- रुपये दुसरा हप्ता बैल पोळा सणाला आणि १०१/- रुपयाचा तिसरा हप्ता दिवाळी सणाला दिला जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांच्या जवळ प्रत्येक सणाला पैसा असेल. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचण येणार नाही. शेतकऱ्याच्या हिताबरोबरच कामगारांचा पगार देखील वेळोवेळी दिला जाईल. असे प्रतिपादन मा. प्रा. श्री शिवाजीराव सावंत सर यांनी केले.



