-->
क्राईमराज्य

इनोव्हा आणि दुचाकीची जोरदार धडक; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार

 

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

इनोव्हा कार आणि दुचाकी मोटारसायकल मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमरावतीतील परतवाडा -बैतूर मार्गावरील निभोंरा फाट्याजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताचा तपास अमरावती पोलिस करत आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या परतवाडा- बैतूल मार्गावरील निभोंरा फाट्याजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. कार आणि दुचाकी यांच्यामध्ये हा अपघात झाला. शिरजगाव पोलिस स्टेशनचे पोलिस रात्री गस्त करत असताना त्यांना या मार्गावरील पुलाजवळ दुचाकीचे सीट पडलेले दिसले. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी थांबून पाहणी केली असता अपघात झाल्याचे समोर आले. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी झालेल्या एक जणास तात्काळ उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे दाखल केले. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढणे देखील कठीण झाले होते.

 

 

या अपघातातील मृतांमध्ये बोदड, खरपी, बहिरम येथील नागरिकांचा समावेश आहे. या अपघातामध्ये संजय गजानन गायन हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर पांडुरंग रघुनाथ शनवारे, सतीश सुखदेव शनवारे, सुरेश विठ्ठल निर्मळे, रमेश धुर्व, प्रतीक दिनेशराव मांडवकर, अक्षय सुभाष देशकर यांचा मृत्यू झाला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close