-->
करमाळामहिलाविषयकराजकिय

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ग्रामीण भागातील घराघरात पोहोचवणार- पद्मजा इंगवले 

 

माय मराठी न्यूज (करमाळा)

 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावात किमान ५० घरात जाऊन आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पोहोचवत असून त्याची जनजागृती करत आहोत. या योजनेत ज्या अडचणी येत आहे त्या अडचणी दूर करण्यासाठी महिला आघाडी सक्षमपणे काम करत आहे. असे शिवसेना महिला आघाडीच्या समन्वय पद्मजा इंगवले यांनी सांगितले.

 

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती बसवंती, मोबीना मुलानी, साधना मोरे यांच्या आदेशाने करमाळा गाव भेट दौरा जिल्हा समन्वयक पद्मजा इंगवले यांनी सुरू केला आहे. सोलापूर जिल्हा महिला आघाडी समन्वयक श्रीमती पद्मजाताई इंगवले व VJNT/ OBC आघाडी जिल्हाप्रमुख सुयश कर्चे यांनी करमाळा तालुक्यातील कामोने व पुनवर येथे महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व बांधकाम कामगार योजना बद्दल माहिती व त्यातून मिळणारे लाभ याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांच्या अडी-अडचणी विचारण्यात आल्या व त्या सोडवण्यास आपला शिवसेना पक्ष सदैव तयार असेल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी तीन महिलांना पदनियुक्ती देण्यात आली.

 

तसेच येणाऱ्या विधानसभेसंदर्भात महिलांना एकत्रित करण्यावर व अजून महिला कशा संघटित होतील यावर पण चर्चा करण्यात आली. करमाळा तालुक्यातील ११८ गावात प्रत्येक ठिकाणी शिवसेना महिला आघाडी सुरू करणार असल्याचे पद्मजा इंगवले यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close