-->
करमाळासामाजिक

करमाळा तालुक्यात धनगर समाजाचे एकदिवसीय धरणे आंदोलन

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

अनुसूचित जमाती आरक्षणातील धनगड (Dhangad) या नोंदीत दुरुस्ती करून धनगर (Dhangar) असे नाव नोंदविण्याची मागणी करत आज तहसील कार्यालय करमाळा येथे सकल धनगर समाजाच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

 

मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत सादर केलेल्या निवेदनात शासनाने त्वरीत आदेश काढून धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात शासन आदेश (GR) काढण्याचा अधिकार असून तो तातडीने वापरावा, अशी ठाम भूमिका मांडली आहे.

 

या आंदोलनात प्रा. शिवाजी बंडगर, गंगाराम वाघमोडे, अतुल पाटील, बाळासाहेब टकले, अंकुश शिंदे, पृथ्वीराज पाटील, अंगद देवकते, शंभुराजे फरतडे, सुनील सावंत, संतोष वारे, विनय ननवरे, समाधान कोळेकर, सतीश निळ, आण्णा सुपनर यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले.

 

सकल धनगर समाज करमाळा तालुक्याच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close