
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब, प्रदेश उपाध्यक्ष सतीश (भाऊ) सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या करमाळा शाखेची कार्यकारणी शासकीय विश्रामगृह, करमाळा येथे आज शनिवार दि. १ मार्च रोजी आयोजित कार्यकारिणी निवड बैठकीत जाहीर करण्यात आली. अशी माहिती डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश उद्धवराव मडके यांनी दिली.
या प्रसंगी करमाळा तालुका उपाध्यक्षपदी टी.व्ही 9 मराठीचे शितलकुमार मोटे, कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी, करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकुर यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे. सहसचिवपदी सुर्यकांत होनप खजिनदारपदी ॲड. सचिन हिरडे, सहखजिनदार किशोरकुमार शिंदे, तालुका संघटक राजू सय्यद, सहसंघटक तुषार जाधव, तालुका संपर्कप्रमुख अंगद भांडवलकर, सहसंपर्कप्रमुख सागर गायकवाड, तालुका व्यवस्थापक संजय साखरे, तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल दामोदरे, तालुका प्रवक्तेपदी प्रा. नंदकिशोर वलटे, कार्यवाह नितीन झिंजाडे, सहकार्यवाह राजाराम माने यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. बैठकीला उपस्थित असणाऱ्या नवनियुक्त सर्व पत्रकार बांधवांचा निवडपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यकारणी सदस्य म्हणून हर्षवर्धन गाडे, राहुल रामदासी शेखर स्वामी, संजय मस्कर, सचिन चव्हाण, प्रवीण अवचर, अविनाश जोशी, संजय कुलकर्णी, नागेश चेंडगे, सचिन जव्हेरी, संजय तेली यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे, ॲड. बाबूराव हिरडे, नासिर कबीर, अलीम शेख, आशपाक सय्यद, अशोक नरसाळे, सुहास घोलप, डी. जी पाखरे, आण्णा काळे यांची निवड करण्यात आली आहे.
मार्गदर्शनपर बोलताना मडके म्हणाले की, डिजिटल मिडियाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये शासनमान्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा चालू असून लवकरच आपल्याला शासन मान्यता मिळणार आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत त्याची प्रकिया सुरू आहे. डिजिटल मीडिया पत्रकार संपादक महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेब यांच्या संकल्पनेतून अथक प्रयत्नांमधून डिजिटल मिडिया पत्रकारितेला अधिमान्यता मिळाली आहे. त्यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी, सवलतींचा लाभ मिळवून देणे, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द राहून काम करणार आहे.
याबरोबरच प्रिंट मिडियाप्रमाणेच डिजीटल मिडियाला शासनाच्या जाहिराती व अधिस्विकृती मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. पत्रकार सुरक्षा, विमा योजना, कुटुंब कल्याण योजना, पेन्शन योजना, पत्रकारांची शासन दरबारी नोंद होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी डिजिटल मीडिया पत्रकार संघ काम करीत आहे. राजा माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना शासकीय सोयी सवलतींचा लाभ मिळवून देणे, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबध्द राहून काम आपण सर्वांनी काम करावे. तसेच ६ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील सावंतवाडी येथे अधिवेशन संपन्न होणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया क्षेत्रातील महाराष्ट्रातून हजारो पत्रकार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनामध्ये नक्कीच पत्रकारांना दिलासा देणारा निर्णय होऊन शासन मान्यता मिळून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कल्याणासाठी हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे तालुका अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांनी सांगितले आहे.




