-->
करमाळासामाजिक

निमगाव (ह.) येथे उद्या वृक्षारोपण व अपंगांना अर्थसहाय्य वाटप.

करमाळा प्रतिनिधी:

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री नानासाहेब निळ मित्र मंडळ व ग्रामपंचायत निमगाव ह यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या निमगाव ह येथे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे ,प्रहार संघटनेचे सोलापूर अध्यक्ष श्री दत्ताभाऊ मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत व करमाळ्याचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण व अपंगांना अर्थसहाय्य वाटप कार्यक्रम असल्याची माहिती श्री. नानासाहेब नीळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की , कोरोणाच्या संकटामुळे सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व काय आहे ते समजले आहे. त्यामुळे हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी निमगाव ह ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे ठरविले आहे. त्याच प्रमाणे समाजातील दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य वाटप करण्याचे नियोजनही केले आहे.

या कार्यक्रमासाठी चंद्रहास बापू निमगिरे, तानाजी बापू झोळ दशरथ शेठ घाडगे,दादासाहेब भांडवलकर, प्रकाश थोरात, पांडुरंग हाके, महादेव धोंडे, अनिल शिंदे, समाधान भो,धनु आबा फरतडे, अमोल फरतडे, फिरोज जागीरदार ,सुनील शेठ कदम, सुभाष हांनपुडे, दिनकर सांगडे, तात्यासाहेब शिंदे ,बाळासाहेब जगदाळे अमोल केसरे, समाधान दौंड, प्रदीप दौंडे ,सुनिता माळी, विकी मोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अधिकाधिक नागरिकांनी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन निमगाव ह चे सरपंच लखन जगताप, उपसरपंच श्रीकांत नीळ व ग्रामसेवक मनोज लटके यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close