प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा हिवताप कार्यालय पंढरपूर व पंचायत समिती आरोग्य विभाग करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र वरकुटे ता. करमाळा येथे दि. २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात आला. वैद्यकिय अधिकारी डॉ. शिवराज घोगरे व डॉ. कोमल शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी श्री. पी.बी. वाडेकर आरोग्य पर्यवेक्षक करमाळा यांनी हिवताप या रोगाविषयी माहिती सांगितली. हिवताप हा डासांमार्फत पसरणारा रोग असून त्याची लक्षणे व त्यावरील उपचारा संबंधीत माहिती दिली. श्री. मनोज पदमाळे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी संशयित हिवताप रुग्णाचा रक्त नमुना घेऊन त्याची कशी तपासणी केली जाते याबाबत ची सविस्तर माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमासाठी गट प्रवर्तक, आशाताई, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हराळ यांनी केले तर आभार श्री. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कदम, श्री. तळेकर, श्री. गोडगे यांनी परिश्रम घेतले.




