-->
करमाळासामाजिक

श्रावण मासातील पाचव्या सोमवारी श्री उत्तरेश्वराची सजावट जेजुरी येथील खंडेरायाच्या रुपात

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री. ऊत्तरेश्वर बाबाच्या मंदिरातील शिवलिंगाची पुजा पाचव्या सोमवार निमित्त व सोमवारी अमावस्या असल्यामुळे जेजुरी च्या खंडेरायाच्या रूपात आकर्षक अशी सजावट करून करण्यात आली होती.

शिवलिंगाला विविध फुलांची सजावट करून खंडोबा मूर्तीचा आकार देण्यात आला होता. तसेच संपुर्ण मंदिरात जेजुरीचा भंडारा उधळल्याने संपूर्ण मंदिर पिवळे झाले होते. मंदिरात पिवळे फुगे लावले होते. यामुळे केम येथे जेजुरी अवतरली आहे असे वाटत होते.

ही संपुर्ण सजावट पुजारी महेश गुरव, भैया गुरव, गणेश गुरव, सिद्धेश्वर गुरव, रामकृष्ण गुरव, यांनी केली. यासाठी दादा नवले, आबा पाटिल यांनीही परिश्रम घेतले. तसेच रविवारी रात्री ०९:०० ते ११:०० या वेळेत ह. भ. प. शिवलाल स्वामी महाराज यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. या किर्तनासाठी खंडाळि, कंदर, नेरले, मिरगव्हाण, वरकुटे येथील भक्तगण ऊपस्थित होते. तसेच रविवारी दादा नवले, चव्हाण भाऊसाहेब, बंडू टकले या भाविकांचे वतीने २१ किलो पेढ्याने पिंड लिपण्यात आली होती.

श्रावन महिन्यातील प्रत्येक सोमवारी उत्तरेश्वर मंदिरात शिवलिंगाची वेगवेगळ्या प्रकारे पुजा करण्यात आली. दर सोमवारी श्री चे दर्शन भाविकांनी कोरानाचे नियम पाळून घेतले. भाविकांना मसाले दूध वाटप करण्यात आले. यासाठी ऊत्तरेश्वर रक्तदाते दाते संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close