वांगी येथील रस्त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक; प्रश्न सामोपचाराने मिटवणार- आ. संजयमामा शिंदे
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील वांगी नं. ३ येथील शेलगांव – ढोकरी रस्त्याच्या संदर्भात करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सोलापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे वांगी नं. ३ येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती.
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आ. संजयमामा शिंदे, उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांतअधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुनर्वसन अधिकारी तांबे, तहसीलदार समीर माने, पुनर्वसनचे जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, ॲड. कमलाकर विर, पप्पू उकिरडे, संजय आंबोले, धनंजय मोरे, वांगी नं. ३ येथील शेतकरी गणेश रोकडे, महेश रोकडे, धनंजय रोकडे, सचिन रोकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रामलिंग खोचरे, आप्पासाहेब डोके, प्रवीण शिंदे गुरुजी, दिलीप यादव, विजय जगताप आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना सदर शेतकरी मोबदला मिळण्याकरिता पात्र आहेत का ? असा अहवाल प्रांताधिकारी आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आठवड्याभरात जे कायदेशिर विषय प्रलंबित आहेत, ते मार्गी लावून सर्व बाबी तपासून निर्णय घ्यावा लागणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी सामोपचाराने प्रश्न सोडावा, असे आवाहन करत वांगी नं ३ येथील शेतकऱ्यांच्या प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात सकारात्मक विचार करावा असे सांगितले.
यावेळी वांगीचे शेतकरी धनंजय रोकडे यांनी पर्यायी जमीन देण्याची मागणी केली आहे. पुनर्वसन मध्ये पर्यायी जमीन मिळाली नाही, धरणात व गावठाणात आठ एकर जमीन गेली असतानासुद्धा, आजपर्यंत मोबदला मिळाला नाही. राहण्यासाठी पुनर्वसन मध्ये प्लॉट मिळावा आणि रस्त्यासाठी जमीन संपादित करून मोबदला मिळावा अशी मागणी करत, दोन वेळा आमच्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे ह्या वेळेस सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्या समोर रोकडे यांनी मांडली.




