
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


पेरणे फाटा, ता. हवेली येथे शौर्यदिनाचे निमित्ताने भीमशक्ती युवा सेनेच्या वतीने सलग चौथ्या वर्षी रक्तदान शिबिराचे युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले. या रक्तदान शिबिरात ७५ च्या आसपास लोकांनी रक्तदान केले. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने भविष्यात रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे विलास इंगळे यांनी सांगितले.
सोलापूर ब्लड बँकेच्या वतीने डॉ. किरण पाटील, सत्यम गायकवाड, राहुल फाटे, धीरज रजपूत, शिवाजी जाधव, रमेश बेरे, प्रकाश सातपुते आदींनी येणाऱ्या रक्तदात्यांची तपासणी केली. तर शिबिराचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन युवा सेनेचे अध्यक्ष सतीश कांबळे, अविनाश इंगळे, जयेश गवई आदींनी केले.




