-->
आरोग्यकरमाळासामाजिक

भीम सैनिकांची जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत च्या माध्यमातून आरोग्य तपासणी

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

पेरणे फाटा, ता. हवेली येथे शौर्यदिनाचे निमित्ताने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र व संपूर्ण देशभरातून येणाऱ्या भीम सैनिकांच्या आरोग्यासाठी पुणे जिल्हा परिषद, हवेली पंचायत समिती तसेच पेरणे ग्रामपंचायतच्या वतीने तब्बल ५ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले असल्याची माहिती पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार यांनी दिली.

आरोग्य तपासणी च्या अंतर्गत १७५० पोलिसांची व इतर नागरिकांची मोफत अँटीजन टेस्ट घेण्यात आली. तसेच इतर ही काही लोकांची कोरोना तपासणी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आली. जे भीम सैनिक मानवंदना देण्यासाठी मास्क चा वापर करत नाहीत अश्या लोकांना तब्बल ५० हजार एन-95 मास्क चे मोफत वाटप १२ पार्किंग मध्ये ८५ आरोग्य सेवकांच्या वतीने करण्यात आले. तसेच ज्या महिला, वृद्ध व नागरिकांना काही आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्यास त्यांच्यासाठी विजयस्तंभ, पेरणे फाटा, विजयस्तंभ पाठीमागील बाजू, तुळापूर फाटा, पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करत उपचार करण्यात आले. यासाठी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य डॉ. नीलिमा इनामदार, डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. प्रियांका सातव – कोलते, डॉ. सचिन सूर्यवंशी, नागसेन लोखंडे, डॉ. वंदना गवळी, डॉ. स्वागत रिंढे, डॉ. प्रतीक वाघ, डॉ. रुपाली भंगाळे, डॉ. सुचिता कदम, डॉ. अनुराधा बोऱ्हाडे यांच्यासह २०० आरोग्य अधिकारी व कर्मचारी, ५ ठिकाणी नागरिकांना आरोग्य सुविधा देत होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close