हवेली प्रतिनिधी


थेऊर येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. थेऊर मधील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक समाज मंदिरात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाज बांधवाकडून अभिवादन व समाजाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी राजे उमाजी नाईक यांच्या नावाच्या घोषणा देऊन जयघोष करण्यात आला. रामोशी सर्व समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच थेऊर ग्रामपंचायत सभागृह कार्यालय येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी आबासाहेब पांडुरंग गावडे, संजय गावडे, थेऊर ग्रामपंचायत सदस्य पै. गणेश सुदाम गावडे, संतोष काकडे, संजय काकडे, माजी उपसरपंच भरत कुंजीर, कुंडलिक गावडे, सुरेश बोडके, महेश गावडे, नवनाथ कुंजीर, श्रीनिवास कुंजीर, मोरेश्वर वैराट, संतोष गावडे, भाऊसाहेब गावडे, कैलास खोमणे, संतोष बोडरे, बाबा चव्हाण, मंगेश गावडे, अजय शितकल, सुरेश गावडे, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.




