ऐन सणासुदीच्या वेळी तालुक्यातील ‘या’ बँकेत तांत्रिक अडचणी; ग्राहकांमधून व्यक्त होतेय नाराजी
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखेतील तांत्रिक अडचणी मुळे बॅकेचे व्यवहार ऐन सणासुदीच्या काळात बंद राहणार असल्याने केम व परिसरातील ग्राहकांमधून बॅकेच्या कारभारा विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव व ग्रामीण भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या केम या गावात राष्ट्रीयकृत बॅकेपैकी बॅक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा आहे. या शाखेमध्ये वांरवार सिस्टिम बंद पडत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. बँकेच्या चुकांमुळे सामान्य नागरीकांची विनाकारण गैरसोय होत आहे. आता सुध्दा कोरोनाचे रूग्ण इंदापूर, अकलूज, बार्शी येथे उपचार घेत आहेत. त्यांना पैशाची गरज आहे. ग्राहकांचे खात्यावर पैसे असताना देखील दुसऱ्या कडून पैसे मागावे लागतात ही शोकांतिका आहे.
तरी बॅकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता सध्या गौरी- गणपती चे सण तोंडावर आले असताना ऐन वेळी बॅकेच्या तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे आर्थिक देवाण घेवणाचे व्यवहार बंद पडल्याने या बँकेचा ग्राहक वर्ग चिंतेत आहेत. नागरिकांना सणासाठी खरेदी करायची आहे. अगोदरच कोरोनामुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद पडले आहेत. त्यामुळे उसने पासने सुध्दा पैसे मिळत नाही. बॅकेने तांत्रिक बाबींकडे लक्ष देण्याची गरज असून येथून पुढे नागरिकांना बॅकेची सेवा चांगली मिळाली पाहिजे अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.



