केम प्रतिनिधी :
शिवसेना 55वा वर्धापनदिन निमित्त्त शिवसेना महिला आघाडी करमाळा अध्यक्षा वर्षाताई चव्हाण यांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, किंग मेकर अजित दादा तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा केम येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवेतील डॉक्टर ,नर्स,प्रशासनातील ग्रामसेवक, पोलिस कर्मचारी वर्ग, तलाठी आणि कोविड योद्धे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी 18ते 44 या वयोगटातील 100 जणांना कोविड लसीकरण करण्यात आले.
सुरुवातीला राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


प्रथमतः पोलिस गायकवाड साहेब, ग्रामसेवक सातव साहेब,तलाठी भाऊसाहेब, डॉक्टर पालखे साहेब, भाऊसाहेब तळेकर गुरूजी ,केंद्रप्रमुख महेश कांबळे, कोविड योद्धे समीर तळेकर, अध्यक्ष सागरराजे तळेकर यांचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला.
आरोग्यसेविका गावडे सिस्टर, घोडके सिस्टर ,कावळे सिस्टर, पुजा तळेकर यांचा सत्कार शिवसेना महिला उपप्रमुख आशाताई टोणपे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच केम गावासाठी जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून दिल्या याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अजित दादा तळेकर यांचा सत्कार वर्षाताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना वर्षाताई चव्हाण म्हणाल्या की केम येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग आपल्या जीवाची पर्वा न करता या कोविड लढा देताना कौतुकास्पद काम करत आहेत. तसेच केम येथील प्रशासन विभाग ग्रामसेवक सातव साहेब, पोलिस गायकवाड साहेब, तलाठी भाऊसाहेब, कोविड योद्धे समीर तळेकर ,सागरराज तळेकर या सर्वांचेच कोरोना युध्दात आपला जीव धोक्यात घालून चांगले काम करत आहेत त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते.
यावेळी रोहिणी नागणे,राणी तळेकर, सुरेखा पळसकर, मंजुळा पळसकर, उज्वला कंगळे, आशा मोरे,हसीना पठाण,दत्ताभाऊ तळेकर, दिलीप दोंड सर,व्हटकर गुरूजी,सचिन जाधव, मोहन काळे ,राजाभाऊ तळेकर,दयाराम तळेकर आदी उपस्थित होते.



