-->
आरोग्यकरमाळासामाजिक

केम ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आले ‘कोरोना जनजागृती अभियान’

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषयक जनजागृती अभियान शुक्रवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२१ रोजी राबवण्यात आले. या अभियानाचे आयोजन केमचे ग्राम विकास अधिकारी श्री. नवनाथ सातव यांनी केले होते.

या निमित्त शिवाजी चौकात भव्य अशी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीच्या माध्यमातून “मास्क लावा, कोरोना टाळा” असा संदेश देण्यात आला होता. हि आकर्षक रांगोळी सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती. यावेळी कोरोना जनजागृतीसाठी गावामधून प्रभात फेरी काढली.

यामध्ये श्री उत्तरेश्वर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज, नूतन माध्यमिक विद्यालय, राजाभाऊ तळेकर विद्यालय, शा. गो. पवार विदयालय, जिल्हा परिषद शाळा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी आदि सहभागी झाले होते. या फेरीमधील सर्वानी मास्क घातले होते. मास्क घाला कोरोना टाळा अशा घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. प्रभात फेरी मेन चौकात आल्यावर ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यानी कोरोना विषयी मार्गदर्शन केले. या वेळी सामाजिक अंतर राखून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close