-->
करमाळाविशेष

मांगी येथील विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात १५ वा क्रमांक; आ. शिंदे यांच्या हस्ते सन्मान

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील प्रगती विद्यालय, मांगी या विद्यालयातील इयत्ता आठवी मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी कु. हर्षवर्धन धनराज देवकर याने पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती फ्रेब्रूवारी २०२० या घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत महाराष्ट्र राज्यात १५ वा क्रमांक मिळविला आहे. तसेच तो शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेला आहे. त्याच्या या यशाबद्दल करमाळ्याचे आमदार मा.संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल हेही उपस्थित होते.

 

 

तसेच यावेळी प्रगती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व विद्यार्थी पालक सौ. देवकर मॅडम यांचाही सत्कार आ.संजय मामा शिंदे यांनी केला. हर्षवर्धन देवकर यास प्रगती विद्यालयातील शिक्षक जमदाडे सर, देवकर सर, उबाळे सर, गोमे सर, घेमाड सर, इरकर सर, देशमाने मॅडम, तात्यासाहेब बागल तसेच जातेगांव केंद्रप्रमुख संतोष पोतदार यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

 

कु. हर्षवर्धन देवकर यास आमदार संजय मामा शिंदे यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या या यशाचे मांगी व परिसरातून कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close