-->
करमाळासामाजिक

कंदरच्या सरपंच सौ. मनिषाताई भांगे यांचा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे हस्ते सन्मान

 

प्रतिनिधी /अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील मौजे कंदर गावच्या महिला सरपंच सौ. मनिषाताई भास्करराव (मालक) भांगे यांचे कार्याची दखल घेऊन आणि त्यांनी कंदर येथे राबविलेल्या विविध विकास योजना, महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकीन स्किम, कोरोना काळात नागरिकांना दिलेली विशेष आरोग्य माहीती आणि मदत यामुळे त्यांची दखल घेऊन संपूर्ण राज्यातील अशा अकरा ग्रामपंचायती मधून कंदर या गावाची निवड होऊन त्याचे पुस्तकरूपी माहीती पुस्तिकेचे प्रकाशन पुणे येथील पत्रकार भवन येथे झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे हस्ते सरपंच सौ. मनिषाताई भांगे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन विशेष अभिनंदन होत आहे. याप्रसंगी कंदरच्या सरपंचाचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याची भावना डॉ. बाबा आढाव यांनी मांडली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close