-->
क्राईम

त्याने फोडले एटीएम कारण…पिस्तुल खरेदी करून करायचा होता एकाचा गेम!

 

 

माय मराठी न्युज

 

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका तरुणाने एटीएम मशीन फोडून चोरी केलेल्या पैशांतून पिस्तूल खरेदी करायचा आणि आपल्यासोबत भांडण करणाऱ्या तरुणाचा गेम वाजवायचा असा प्लॅन केला होता. त्यानुसार त्याने नवी सांगवी येथील अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला एटीएम फोडून चोरी करता आली नाही. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने सदर तरुणाला अटक केली असून विशाल दत्तू कांबळे (वय 24, रा. संगमनगर, नॅशनल स्कूल गेट नंबर 20, रेल्वे लेन, जुनी सांगवी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि.१६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ०१:०० वाजताच्या दरम्यान एका चोरट्याने जुनी सांगवी येथील अॅक्सीस बँकेच्या एटीएमची तोडफोड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने सदर घटना घडलेल्या परिसरातील तब्बल ८० ते ९० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता पोलिसांनी एका संशयित तरुणाची माहिती काढली. एटीएम मधील पैसे चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीने घातलेला शर्ट आणि सँडल वरून पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी संगमनगर, गेट नंबर २०, जुनी सांगवी या परिसरातील असावा अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुन्हा तपासचक्रे फिरवली.

 

पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांना सोमवारी रात्री ०८:३० वाजता एक संशयित तरुण आढळला. तो इसम मोटार सायकल वरून अहिल्यादेवी चौकाकडून साई चौकाकडे जात असताना पोलिसांनी त्याचा काही वेळ नकळत पाठलाग केला. तो एका हॉटेल जवळ तो थांबला असताना त्यास पोलीस नाईक राजेश कौशल्ये यांनी दारू कुठे मिळेल असे विचारले तेव्हा त्याने जवळच्या परिसरात दारू मिळेल असे सांगितले. कौशल्ये यांनी त्यास दारू पिण्यास सोबत जाऊ असे म्हणून विश्वासात घेऊन नंतर त्याच्याकडे चौकशी केली.

 

त्यावेळी त्याने सांगितले की, मागील आठवड्यामध्ये सांगवी परिसरामध्ये ऐकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून एका मुलाने मारहाण केली होती. त्याच गोष्टीचा राग मनामध्ये असल्याने, त्याचा बदला घेण्यासाठी आणि मारहाण केलेल्या मुलाचा गेम वाजविण्यासाठी पिस्तुलची आवश्यकता होती. पिस्तुल आणण्यासाठी एटीएम फोडून मिळालेल्या पैशातून पिस्तुल खरेदी करून मारहाण करणाऱ्या मुलाला काही अंतरावरून गोळी मारायची होती, असा त्याचा प्लॅन होता. म्हणून त्याने एटीएम फोडले असल्याची कबुली पोलीसांना दिली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close