
करमाळा/प्रतिनिधी


श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये सकाळ समूहाच्या वतीने आज शनिवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली योग समितीचे करमाळा तालुका प्रभारी श्री बाळासाहेब नरारे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोहिते मॅडम उपस्थित होत्या.
सर्वप्रथम श्री नरारे सर यांनी स्वतः सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविले व नंतर मुलांकडून ही सूर्यनमस्कार करून घेतले. त्याचबरोबर आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी सूर्यनमस्कार कशा प्रकारे उपयोगी आहेत, त्याबद्दल माहिती सांगितली. तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार किती महत्त्वाचे आहेत याबद्दल सांगितले. आपला देश बलशाली, सदृढ करण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली तरच स्वतःबरोबर गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश कसे बलशाली होतील याबद्दलही सांगितले. मुलांसाठी सुरू करण्यात येणारे सकाळ स्वास्थ्य सदर याबद्दल तसेच सकाळ स्वास्थ्य प्रश्नमंजुषा २०२३ या योजने बाबतही माहिती दिली. मुलांनीही आजपासून आपण सूर्यनमस्कार करणार असे आश्वासन दिले व उत्साह पूर्वक सूर्यनमस्कार केले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री कन्हैयालालजी देवी सर, संचालक श्री अमोदजी संचेती, श्री चंद्रकांतजी देवी, श्री विजयजी दोशी, सौ. सुनीता कन्हैयालाल देवी उपस्थित होते. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ अश्विनी शिरसागर मॅडम यांनी मानले.




