-->
करमाळासामाजिक

प्रा. रामदास झोळ सर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा

 

माय मराठी न्यूज (अंगद भांडवलकर)

 

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून झोळ सर यांचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा रामदास झोळ मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करमाळा येथील बारा बंगले या ठिकाणच्या संपर्क कार्यालयात करण्यात आले होते.

 

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. झोळ सर म्हणाले की, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण कार्यरत असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांच्या सेवेसाठी आपण सदैव कार्यरत राहणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाची एकही संस्था कार्यरत नाही. त्यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक विद्यार्थी- विद्यार्थीनींची कुचंबना होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात एक उत्तम शैक्षणिक संकुल उभारणार आहे. त्यासाठी देवळाली परिसरात जमीन खरेदी केलेली आहे. वैद्यकिय अभ्यासक्रम तसेच व्यवस्थापन व संगणकीय अभ्यासक्रम करमाळा तालुक्यात उपलब्ध नसल्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते. यामुळे गरीब विद्यार्थ्यांना तसेच मुलींना शिक्षणा पासून वंचित रहावे लागत आहे. ही बाब आम्ही लक्षात घेऊन तालुक्यात असे शिक्षण सुरू करण्याच्या दृष्टीने संस्थेने विचार केला आहे. त्यानुसार देवळाली परिसरात सर्वांना उपयुक्त होईल अशी जागा शिक्षणासाठी खरेदी केली आहे. लवकरच शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येईल, तसेच भविष्यात करमाळा तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास असल्याचे प्रा. रामदास झोळ सर यांनी शेवटी सांगितले.

 

करमाळा तालुक्यातील बलभिम महाराज बालक आश्रम पांगरे, रत्नप्रभादेवी पाटील आश्रम केम, जगदंबा कमलाभवानी मुकबधिर निवासी विद्यालय देवीचामाळ, ज्ञानप्रबोधन मतिमंद विद्यालय कोर्टी या शाळेमध्ये मिष्टान्न भोजन देण्यात आले. तसेच मुक्या प्राण्यांच्या, पक्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी वनविभागातील पाणवठे टॅंकरद्वारे भरून देण्यात आले असून करमाळा तालुक्यातील दहा गावात ५२ बाकडे बसविण्यात आले आहेत. पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

 

प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून फोनद्वारे, सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close