
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

बँकेत असलेली कागदपत्रे वापरुन खातेदाराच्या नावे खोटे कर्ज प्रकरण करुन ७० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आण्णासाहेब मगर बँकेच्या कोरेगांव भिमा येथील शाखेच्या मॅनेजरसह चारजणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी वृशाली हनुमंत गव्हाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती हनुमंत गव्हाणे यांचे कोरेगाव भिमा येथे फर्निचर चे दुकान आहे. दुकानातील गरजेसाठी १५ लाखांचे कर्ज आवश्यक होते. म्हणून बॅंकेत संपर्क साधण्यात आला. यावेळी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन नातेवाईक गजानन साकोरे यांच्या ओळखीतून सचिन सातपुते यांची जमिन बॅंकेत तारण ठेवण्यात आली. त्यानंतर सहा महिन्यांनी सचिन सातपुते यांनी ऑडी कारसाठी गव्हाणे यांच्या नावावर २ फेब्रुवारी २०१६ रोजी ४८ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र कार खरेदी न करता त्यातील ४० लाख रुपये हनुमंत गव्हाणे यांचे परवानगी शिवाय बँक अधिकाऱ्यांनी सचिन सातपुते यांच्या खात्यावर वळविले.
हे प्रकरण दडपण्यासाठी आण्णासाहेब मगर बॅंकेच्या कोरेगाव भिमा शाखेचे चेअरमन नंदकुमार लांडे यांचे सहमतीने प्रत्येकी ३५ लाखाचे दोन फ्लॅट असे एकूण ७० लाख रुपये मंजूर पत्र दिले. पुढे फ्लॅट रद्द करुन ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली. तक्रारदार वृषाली गव्हाणे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिवाजीनगर कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी गजानन साकोरे (३५ वर्ष) रा. केंदूर, बॅंकेचे व्यवस्थापक गजानन कुलकर्णी (५५ वर्ष) रा. लांडेवाडी, सचिन सातपुते (४० वर्ष) रा. चंदननगर, कुलदिप शर्मा (४१ वर्ष) रा. दत्तवाडी, अजित लोंढे (५३ वर्ष) रा. रास्ता पेठ पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अण्णासाहेब टापरे पुढील तपास करीत आहे.
आण्णासाहेब मगर सहकारी बँक शाखा कोरेगाव भीमा, बँक अधिकारी, जनरल मॅनेजर गजानन श्रीधर कुलकर्णी, सचिन ज्ञानदेव सातपुते, गजानन ज्ञानेश्वर साकोरे, कुलदीप शर्मा, अजितकुमार लोंढे यांनी सर्वांनी संगनमत करून हनुमंत गव्हाणे यांच्या नावावर केलेला ४८ लाख रुपयांचा ऑडी गाडी चा फ्रॉड लपवण्यासाठी पुन्हा गव्हाणे यांच्या पत्नीचे नावाचे कागदपत्रे वापरून फ्लॅट खरेदीचे फ्रॉड कर्ज प्रकरण केले. आत्तापर्यंत बँकेने ४८ लाख रुपये, ४ लाख ३० हजार रुपये, १० लाख रुपये असे एकूण १ कोटी ७० लाख रु एवढी कर्ज रक्कम आमच्या खात्यावरून काढून आमची फसवणूक केली आहे.
-वृशाली हनुमंत गव्हाणे (तक्रारदार) माजी उपसरपंच क़ोरेगाव




