-->
माहिती विषयकविशेष

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाचे बीटस्तरीय पालवी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/ सिन्नर (माय मराठी न्यूज)

 

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर दोन अंतर्गत वडांगळी विभाग व नांदूर शिंगोटे विभागात शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२५ रोजी सातवे बीटस्तरीय पालवी प्रशिक्षण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणा दरम्यान बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. संजय मोरे साहेब यांनी भेट देऊन व प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन व चर्चा केली. तसेच अंगणवाडी केंद्र वडांगळी व शिवाचा मळा येथे बांधकाम विषयक जागा पाहणी व ग्रामपंचायत भेट करण्यात आली.

 

पालवी प्रशिक्षणाच्या उपक्रमांतर्गत आजच्या प्रशिक्षणामध्ये वयानुसार गट, भाषेच्या विकासामध्ये अक्षर परिचय व स्वरचिन्ह परिचय, गणितीय पाठामध्ये चिन्ह, राशी समन्वय, शून्याचा संबोध, ठिपक्यांचे कार्ड वापरून मोजणी आणि दृष्टिक्षेपात मोजणी तसेच बोधात्मक विकासामध्ये पाहुणा ओळखणे, कला अनुभवमध्ये घडी काम, समूह खेळ, बडबड गीत, अभिनय गीत इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे नियोजन पर्यवेक्षिका सविता होलगडे मॅडम व ऋतिक सर तसेच पर्यवेक्षिका सुरेखा शिंदे व तेजल मॅडम, गीता खुळे, प्रतीक्षा मोरे, सुवर्णा शिंदे व त्यांचा रिसोर्स गटाने केले.

 

या प्रशिक्षणा दरम्यान पालवी प्रकल्पाच्या व्यवस्थापक भावना पाटील मॅडम व QUEST अंतर्गत उत्तर प्रदेश येथील समन्वयक निलेश सर, फुलकुमारी मॅडम, जया मॅडम व शबाना मॅडम यांनी भेट देऊन प्रशिक्षण निरीक्षणे नोंदवून अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close