-->
करमाळाराजकियसामाजिक

भिलारवाडी व कुंभारगाव ग्रामपंचायतच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार संजयमामा शिंदे यांची भेट

विकास कामाबाबत आ. शिंदे यांचे ठोस आश्वासन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील ३० ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी गेल्या महिन्यामध्ये पार पडली. ग्रामपंचायत मध्ये थेट जनतेतून सरपंच निवडले गेल्यानंतर उपसरपंच यांची निवड प्रक्रिया जानेवारीमध्ये सुरू आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती मध्ये नूतन उपसरपंचांच्या निवडी झाल्यानंतर त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन विकास कामाबाबत मागणी केलेली आहे.

यामध्येच काल शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी ॲड. अशोक गिरंजे यांचे नेतृत्वाखाली भिलारवाडी ग्रामपंचायतचे नूतन पदाधिकारी तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी यांनी आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन विकास कामांना सहकार्य करण्याची मागणी केली. कुंभारगाव येथील माजी सरपंच महेंद्र पानसरे व माजी उपसरपंच नानासाहेब आढाव, माजी पंचायत समिती सदस्य लालासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुंभारगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी गावातील जनतेने नेतृत्वावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू. एप्रिल २०२३ नंतर दोन्ही गावांना विकास कामासाठी भरीव निधी देऊ असे आश्वासन दिले. यावेळी दोन्ही गावातील पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार आमदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी भिलारवाडी येथील सरपंच प्रतिनिधी नवनाथ जगन्नाथ अंबोधरे, उपसरपंच आजिनाथ मारुती पानगे, ग्रामपंचायत सदस्य बजरंग काशिनाथ गिरंजे, किसन भाऊसाहेब धावडे, सदस्य प्रतिनिधी विश्वास जगन्नाथ उगलमुगले, गोरख बापू काटे, बापू कांतीलाल गिरंजे, गंगाराम कांतीलाल माने, हनुमंत सोमनाथ गुंजाळ तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायटी भिलारवाडी चेअरमन नवनाथ आबा मेरगळ, सदस्य अंकुश संभाजी गिरंजे, अंबादास सावराम लष्करे, सखाराम तुळशीराम धोंडे, राजेंद्र दादा गिरंजे, संतोष भानुदास माने, भाऊराव साधू पानगे, ॲड. अशोक संभाजी गिरंजे, ॲड. सुमित अशोक गिरंजे, मारुती नारायण धावडे, बाळासाहेब नामदेव काटे, दादासाहेब रामचंद्र गिरंजे आदी भिलारवाडी चे ग्रामस्थ उपस्थित होते.

कुंभारगावचे नूतन सरपंच सौ. सुनीता रामदास पोळ, उपसरपंच सौ. सारिका दत्तात्रय भालेराव, ग्रामपंचायत सदस्य कीर्तीबाला नानासाहेब आढाव, सौ. काजल राहुल पानसरे, सौ. सरस्वती बबन राऊत, श्री मारुती काशिनाथ कुंभार, श्री जनार्दन भिकाजी भोसले, श्री आजिनाथ रामदास गायकवाड, माजी सरपंच तानाजी पानसरे, महेंद्र पानसरे, माजी उपसरपंच नानासाहेब आढाव, माजी पं. स. सदस्य बाळासाहेब पाटील, माजी उपसरपंच बाळू गलांडे, महादेव देशमुख, नवनाथ भालेराव, लक्ष्मण पोळ, पोपट पानसरे, राहुल पानसरे, विकास पानसरे, अण्णा पानसरे, दादा पानसरे, पप्पूशेठ पानसरे, बाळासाहेब आढाव, बाबा पानसरे आदी कुंभारगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close