
नाशिक/प्रतिनिधी


अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने नाशिक येथील सिन्नर फाटा, नाशिक रोड, स्वागत लॉन्स मध्ये गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप करणे या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक चे खासदार हेमंत गोडसे हे होते. कार्यक्रमासाठी परिसरातील रहिवाशी, गरजू विद्यार्थी तसेच नाशिक जिल्ह्यातील मान्यवर यांची उपस्थिती लक्षणीय होती. सर्वप्रथम समाजसेविका अनिता चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन उत्स्फूर्त व प्रेरित केले. हा उपक्रम विशेषतः गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार हेमंत गोडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका जयश्री खर्जुल, नगरसेवक शिवाजी भागवत, जेष्ठ समाजसेविका व मार्गदर्शक सारिका नागरे, समाजसेविका व पार्टी सेवक अनिता चौधरी, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक अमोल सिंग नागी, माजी नगरसेवक कुसुम चव्हाण, मार्गदर्शक नेते शैलेंद्र उदावंत, माजी नगरसेवक कन्हैया साळवे, युवा नेते सचिन आहेर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नाशिक उपाध्यक्ष विजय देवरे, महिला जिल्हाध्यक्षा सोनाली जाधव, महिला उप जिल्हाध्यक्षा आरती भोज, नाशिक संपर्कप्रमुख रूपाली माळवे, तालुका उपाध्यक्ष महावीर सोनवणे, उपजिल्हाध्यक्ष धनाजी टिळे, नाशिक रोड अध्यक्ष रवींद्र गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड, सचिव विशाल साळवे, नाशिक मध्य अध्यक्ष जावेद शेख, भगुर उपाध्यक्ष राजेंद्र मांडे, देवळाली अध्यक्ष निलेश बंगाली, भगूर महिला अध्यक्षा हिना शेख, बाळासाहेब कानडे, संजय शिंदे, अजय उनवणे, संजय बलकवडे, अन्सारी, सागर चंद्रमोरे, संदीप चंद्रमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, अशा सामाजिक उपक्रमांची सद्य परिस्थितीत अत्यावक्षता आहे. अमोल भागवत आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. शिवाजी भागवत यांनी आपल्या प्रभागामध्ये अतिशय गरजेचा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. यानंतर उपस्थित गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप तसेच माजी नगरसेवक शिवाजी भागवत यांच्या वतीने अल्पोपहार व चहा पानाचे नियोजन केले होते.
या प्रभागातील मनपा नगरसेविका जयश्री खरजुल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठ समाजसेविका व काँग्रेस नाशिक रोड विभाग उपाध्यक्षा कुसुम चव्हाण यांनीही आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यासाठी कार्यरत राहूया असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र श्रीवंत यांनी आरती भोज व मेघा सांगळे यांच्या सहकार्याने उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. उपस्थितांचे आभार समितीच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली जाधव व नाशिक उपाध्यक्ष विजय देवरे यांनी मानले.




