-->
करमाळा

श्री उत्तरेश्वर विद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचा ३६ वा स्मृतिदिन साजरा

 

करमाळा/प्रतिनिधी

 

केम (ता. करमाळा) येथील श्री. उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि. ८ ऑगस्ट) रोजी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ३६ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी गुरव यांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच के.आर. सुरवसे सर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर, माजी सहशिक्षक के.आर. सुरवसे सर यांची विशेष उपस्थिती होती. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत डॉ. बापूजी साळुंखे यांचा जयघोष करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. प्रभात फेरीनंतर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी यांचे कार्याविषयी के.एन. वाघमारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी ही आपल्या भाषणातून उपस्थितांना दिली. तसेच बापूजींचे कार्य आपल्या शब्दात मांडले.

 

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.एन. वाघमारे सर यांनी केले. तर पी.डी. कोंडलकर सर यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, विद्यार्थी तसेच केम पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close