-->
राजकियराज्य

कोरेगाव भीमा विकास सोसायटीवर भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनेलची एक हाती सत्ता

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

“भैरवनाथाच्या नावाने चांगभलं” च्या जयघोषात नुकत्याच पार पडलेल्या कोरेगाव भीमा विविध कार्यकारी विकास सोसायटी नंबर २ च्या निवडणुकीत श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनलने सर्वांच्या सर्व १३ जागांवर विजय मिळवीत विकास सोसायटीवर आपला झेंडा रोवला. अगदी औपचारिकता असलेल्या निवडणुकीत काही ठिकाणी मात्र घासून मतदान झाले असले तरी ही सर्वच जागा जिंकल्याने श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनेलच्या कार्यकत्यांनी फटाके वाजवत, भंडारा, गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग. द. पुंड यांनी तर त्यांना संस्थेचे सचिव मधुकर कंद यांनी मदत केली.

 

 

सोसायटी निवडणुकीत यंदा १३ जागांसाठी तब्बल ६३ इच्छुकांनी अर्ज भरले होते. अखेरच्या टप्यात अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने १३ जागांसाठी अखेर २२ उमेदवार निवडणुकीच्या आराखड्यात उतरले होते. त्यातील अनेकांनी मतदानाच्या काही दिवस आधी इतर उमेदवारांना बिनशर्त पाठींबा दिल्याने त्याच वेळी निवडणूक फक्त औपचारिक राहिली होती. निवडणुकीत आधीच सर्वसाधारण महिला प्रतिनिधी म्हणून विमल ज्ञानेश्वर शिंदे, सारिका संभाजी गव्हाणे तर भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी संतोष बाळू माकर बिनविरोध आल्याने १० जागांसाठी २२ उमेदवार निवडणुकीच्या आराखड्यात होते. यावेळी तब्बल १०२१ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानात भाग घेतला. अखेर कोरेगाव भीमा विविध कार्यकारी विकास सोसायटी नंबर २ वर श्री भैरवनाथ ग्रामविकास सहकार पॅनेलने आपला दबदबा दाखवत सर्वांच्या सर्व १३ जागा जिंकल्या.

 

 

या निवडणुकीत सर्वसाधारण खातेदार प्रतिनिधी अनिल एकनाथ गव्हाणे ८४५, अशोक दत्तात्रय गव्हाणे ८२५, नागनाथ जगन्नाथ गव्हाणे ८६९, प्रवीण बाबुराव गव्हाणे ८४५, बबुशा आनंदराव ढेरंगे ८१०, अशोक देवचंद नाबगे ७९४, पंडित केशव फडतरे ८२३, महादेव सोपान फडतरे ८०१, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी रामदास गुलाब कांबळे ७८७, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी बाळासाहेब दत्तात्रय वाडेकर ४७० यांनी विजय मिळविला. निवडीनंतर गावातून विजयी उमेदवारांची गुलाल, भंडारा उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

 

श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वतीने माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे, बाळासाहेब फडतरे, संदीप ढेरंगे, राहुल गव्हाणे, विजय गव्हाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य पंढरीनाथ गव्हाणे, नारायण फडतरे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी चेअरमन सुनील गव्हाणे, मधुकर शामराव गव्हाणे, मधुकर फक्कड गव्हाणे, घोडगंगेचे माजी संचालक विक्रम गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, वसंत गिलबिले, बारीकराव रामचंद्र गव्हाणे, बारकू गव्हाणे, गणेश नाबगे आदींनी सहकार्य केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close