विद्यार्थीनींनी शालेय परीक्षेबरोबरच जीवनातील संघर्षाच्या परीक्षेसाठी सिद्ध झाले पाहिजे – पो.नि. सूर्यकांत कोकणे
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


विद्यार्थिनींनी शालेय अभ्यासाबरोबर आपल्या जीवनातील प्रत्येक पायरीवरील संघर्षाच्या परीक्षेसाठी सिद्ध असले पाहिजे. असे प्रतिपादन करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे साहेब यांनी श्री कमला देवी कन्या विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमा निमित्त मार्गदर्शनपर बोलताना केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर. बोलत होते. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कोणत्याही क्षेत्रातील करिअर निवडले तरी त्यातील सर्वोच्च ज्ञान प्राप्त केले पाहिजे, मग यश आपोआपच पाठीमागे धावत येते. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुक्ता शेलार या होत्या. तर व्यासपीठावर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक श्री. गणेश भाऊ चिवटे, श्री. घनश्यामदास गांधी, प्रशालेतील शिक्षक श्री. भीष्माचार्य चांदणे, श्री. पोपट शिंदे, श्री. प्रवीण बिनवडे, श्रीमती ज्योती शहाणे, श्रीमती सुरेखा शिंदे, श्रीमती अनिता हौसारे, श्रीमती तृप्ती ठिगळे, श्रीमती ज्योती भोसले, श्री. प्रमोद शहाणे, श्रीमती शारदा गंधे, नाना रामनवमीवाले उपस्थित होते.



