जांभूड चे सुपुत्र मेजर बापूराव कचरे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

माय मराठी न्यूज नेटवर्क


जांभूड (ता. माळशिरस) येथील भारत मातेचे व जांभूड गावचे सुपुत्र मेजर बापूराव हरिदास कचरे यांनी सी.आर.पी.एफ मध्ये २३ वर्ष देशसेवा केल्याबद्दल मंगळवार दि. ४ जुलै रोजी त्यांचा जांभूड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी जांभूड गावचे सुपुत्र मेजर बापूराव कचरे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा जांभूड मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश हरिदास धुमाळ यांनी केले. तसेच मेघराज कचरे, सतिश पवार, मेजर मोरे साहेब, राजकुमार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजित शिंदे, भाजपचे नेते राजकुमार पाटील, अवि इनामदार, सहकार महर्षीचे व्हाईस चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, भाजपचे के.के. पाटील, माळशिरस तालुका आजी माजी सैनिक संघटना, त्रिदल सैनिक सेवा संघ, जांभूडचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा सोसायटी चे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ, नागरिक व युवा वर्ग उपस्थित होते. तसेच जांभूड, बोरगाव, महाळुंग, श्रीपूर, नेवरे, विठ्ठलवाडी, खळवे, दसूर, उघडेवाडी, माळेवाडी (जा) येथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, कृषी, पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मान्यवर, हितचिंतक उपस्थित होते.
उत्कृष्ट सूत्रसंचालन केल्याबद्दल निवेदक विलासराव दोलतडे यांचा सन्मान जांभूड ग्रामस्थ व कचरे परिवाराच्या वतीने करण्यात आला.




