-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

करमाळा तहसील कार्यालयातील ऊसदर संघर्ष समिती व साखर कारखानदार यांची बैठक निष्फळ

ऊसदर संघर्ष समिती च्या आगामी भूमिकेकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष...

 

करमाळा/प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक, कारखाना प्रतिनिधी व सर्व शेतकरी संघटना तसेच ऊस दर संघर्ष समिती यांच्यामध्ये ऊस बिलाची पहिली उचल व अंतिम दर याबाबत तहसील कार्यालय येथे आज बुधवार दि. ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी तहसीलदार मा. श्री. समीर माने साहेब, नायब तहसीलदार श्री. जाधव साहेब, करमाळा पोलीस स्टेशनचे श्री. जगताप साहेब यांच्या समवेत ऊस दर संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने ही बैठक निष्फळ ठरली आहे.

करमाळा ऊसदर संघर्ष समिती व साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक व कारखाना प्रतिनिधी यांच्यामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झाली, परंतु ऊस दराची कोंडी फुटली नाही. साखर कारखानदार यांनी ऊस बिलापोटी पहिली उचल म्हणून २३००/- रुपये तसेच बैलपोळा सणासाठी १००/- रुपये व दिवाळी सणासाठी १००/- रुपये प्रमाणे मिळून २५००/- रुपये अंतिम दर अशी भूमिका मांडली. मात्र करमाळा ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पहिली उचल २५००/-रुपये व अंतिम एफ आर पी ६००/- रुपये असे एकूण ३१००/- रुपये प्रमाणे दर मिळावा या भूमिकेवर ठाम आहे.

करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांनी दोन्ही बाजू समजून घेऊन साखर आयुक्तालय पुणे येथे पत्र व्यवहार केला व यावर तोडगा काढण्याचे सांगितले. तसेच दोन्ही बाजूचे निवेदन स्वीकारले. या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने ऊस दर संघर्ष समिती व तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना काय भूमिका घेणार..? याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रविभाऊ गोडगे, रयत क्रांतीचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सरडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, रयत क्रांतीचे प्रांतिक सदस्य अजय बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रांत सदस्य प्रा. नागेश माने सर, तालुका उपाध्यक्ष शिवाजी बनकर, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, तालुका युवा अध्यक्ष बापू फडतरे, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, बापू वाडेकर, बापू लुंगारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close