-->
आरोग्यमहिलाविषयकराज्यसामाजिक

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून “एक मुठ पोषण आहार” योजनेस सुरुवात

 

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

 

मुख्य कार्यकारी अधिकारी मा. लिना बनसोड मॅडम जिल्हा परिषद नाशिक यांच्या संकल्पनेतून दिनांक १९ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार “एक मूठ पोषण आहार वाटप” या योजनेस सुरगाणा तालुक्यातील मानी बीटमध्ये दिनांक २० जानेवारी पासून सुरुवात करण्यात आली आहे.

 

 

 

          मानी बीटमधील मानी ग्रामपंचयतीने सण २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये १०% ग्रामनिधी हा महिला व बालकल्याण खर्चातून कुपोषित बालकांना तसेच जोखमीच्या माता या लाभार्थीना १ मूठ पोषण आहार वाटप करण्यात आले. या आहारात नारीयल तेल, बटाटे, फुटाणे, गूळ व शेंगदाणे देण्यात आले.

 

 

 

       यावेळी ग्रामपंचयत चे प्रशासक श्री. कुसाळकर साहेब, ग्रामसेवक धूम भाऊसाहेब, पर्यवेक्षिका सविता होलगडे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भागीरथी राऊत, चित्रा राऊत, मीना जाधव, मीरा भोये, मीरा पवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक, गावातील जेष्ठ नागरिक व समाजसेक श्री. राजेंद्र पवार, माजी सरपंच श्री. चौधरी साहेब आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close