-->
करमाळासामाजिक

मांगी जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी उमेश बागल यांची बिनविरोध निवड

 

करमाळा/प्रतिनिधी

 

मांगी (ता. करमाळा) येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या फेर निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून उमेश बागल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया आज शनिवार दि. ३० डिसेंबर रोजी शाळेचे मुख्याध्यापक पोतदार सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

या प्रसंगी उपाध्यक्ष म्हणुन कल्पना निळकंठ राऊत, सोनाली राजेश संचेती, विक्रमा संतोष बनसोडे, काजल राहुल अवचर या चार महिलांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून प्रकाश उत्तम ननवरे, गुलाब दत्तु क्षिरसागर, अमोल पोपट गायकवाड यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच माता पालक समितीमध्ये सिमा अशोक गवळी, शीला प्रविण अवचर, कल्याणी अमोल माने या महिलांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रकाशराव काळे सर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.

 

यावेळी सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या. तसेच सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक पोतदार सर, कौले सर, पवार मॅडम, देमुंडे मॅडम, पोतदार मॅडम यांनी तसेच उपस्थित ग्रामस्थांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close