-->
करमाळाराजकियसामाजिक

जनसुविधा व नागरी सुविधा योजनेअंतर्गत गणेश चिवटे यांच्या प्रयत्नातून तालुक्यासाठी ४८ लाखाचा निधी मंजूर

 

करमाळा/प्रतिनिधी

 

भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांची नुकतीच जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांनतर अवघ्या एक महिन्यातच चिवटे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा व नागरी सुविधा अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

 

करमाळा तालुक्यातील मौजे खडकेवाडी येथे गाव अंतर्गत सिमेंट काँक्रिटीकरण करणे, भालेवाडी येथे आरो प्लांट (पाणी फिल्टर) बसविणे, तसेच वीट, करंजे, रोशेवाडी, मोरवड, पिंपळवाडी, वंजारवाडी, हिवरवाडी, देवळाली, हिसरे व फिसरे येथील गावांतर्गत वाडी- वस्त्यांवरील रस्त्यांची कामे मंजूर करून आणली आहेत.

 

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून या पुढेही करमाळा तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 

गणेश चिवटे यांनी ग्रामीण भागातील गरजेचे रस्ते मंजूर केल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असल्याचे दिसून येत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close