-->
करमाळाविदेश

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडी जाहिर

केम प्रतिनिधी/ संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम याठिकाणी शासकिय नियमानुसार शैक्षणिक वर्ष २०२१ – २०२४ या कालावधीसाठी शालेय व्यवस्थापन समितीची निवड अगदी खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आली. श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री विष्णू कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी सदर बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी केम, पाथर्डी, मलवडी, उपळवाटे, वडशिवणे, भोगेवाडी, जाखले या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी प्रथम सर्व उपस्थित पालकांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्राचार्य श्री विष्णू कदम यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये शालेय व्यवस्थापन समितीची प्रकिया समजावुन सांगितली व त्यानुसार सर्व उपस्थित पालकांच्या व ग्रामस्थांच्या सहमतीने सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री. दयानंद बाळासाहेब तळेकर यांची, तर उपाध्यक्ष पदी सौ. उज्वला संदिप तळेकर यांची व सचिवपदी प्राचार्य श्री. विष्णू कदम तसेच श्री. संभाजी अभिमन्यू गुरव, श्री हरिदास नामदेव बोगांळे, श्री सुरेश साधु मोटे, श्री दिपक अनंता तळेकर, श्री धनाजी हरिभाऊ ताकमोगे, श्री राहुल शांताराम रामदासी, श्री विकास तानाजी कळसाईत, सौ. सुवर्णा अविनाश पवार, सौ. पल्लवी सचिन रणशृंगारे, सौ. अन्नपूर्णा मुकेश राऊत, सौ. रोहिणी उत्पल भोसले, सौ नागर शहाजी शेळके, ग्रामपंचायत नियुक्त सदस्य श्री सचिन सर्जेराव बिचितकर, शिक्षणप्रेमी नियुक्त सदस्य श्री ज्ञानेश्वर विठ्ठलराव पाटील, शिक्षकप्रतिनिधी सदस्य श्री दिलीप निवृत्ती तळेकर यांची सन्माननीय सदस्यपदी निवड करण्यात आली.

 

या निवडीच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. मोहन आबा दोंड, मा. सभापती श्री शेखरतात्या गाडे, श्री अनंता तळेकर, श्री सरदार पठाण, श्री गणेश तळेकर, श्री मनोजकुमार सोलापूरे, श्री संदिप तळेकर श्री गोरख खानट, श्री वसंत तळेकर सर, श्री धनंजय सोलापूरे, श्री बापूराव तळेकर, श्री नरहरी दोंड, श्री दत्ताभाऊ तळेकर, श्री श्रीकांत दोंड, श्री सागर तळेकर, श्री शिवाजी पाटील, श्री संतोष रायचुरे, श्री संजय नवले, श्री बाळू खानट, श्री सचिन रणशृंगारे, श्री संतोष खानट, सौ. सुजाता अवधुत येवले, सौ. नम्रता अविनाश येवले, सौ. अनिता पांडुरंग जाधव, श्री अमोल घोसे, श्री संभाजी दोंड, श्री दिलीप चांदगुडे, श्री रोहिदास मुटेकर यांचेसह पालक व ग्रामस्थ मोठया सख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

या निवडीवेळी नूतन अध्यक्ष म्हणाले कि, या शाळेत राजकारण न आणता ही शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून निर्माण करण्याचा मी प्रयत्न करीन. तसेच नूतन उपाध्यक्षा सौ. ऊज्वला तळेकर म्हणाल्या की, मी या शाळेतील मुलीना बचत करण्यासाठी व दहावीमध्ये शिकत असलेल्या मुलीना बचत गटामार्फत करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण देण्याचा मी प्रयत्न करीन. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close